शुभांगीचा थक्क करणारा सामाजिक प्रवास

माझे नाव शुभांगी सुनील कुलकर्णी राहणार बावी तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद येथील रहिवासी माझे शिक्षण बारावी पास शिवाजी कॉलेज बार्शी येथे झाले माझ्या कुटुंबात एकूण चार व्यक्ती आहेत मी माझे मिस्टर माझी एक मुलगी व एक मुलगा आहे मुलगी बारावीला आहे मुलगा दहावीला आहे आणि माझे मिस्टर दुग्ध व्यवसाय शेती करतात सुरुवातीला घरामध्ये गृहिणी म्हणून काम करत होते

माझा टेलरिंगचा व्यवसाय होता परंतु बाहेर कोणाबरोबर ओळख नसल्यामुळे व्यवसाय चांगला चालत नव्हता त्यामुळे घरची परिस्थिती खूपच बिकट होती आणि समाजामध्ये कोणतेही स्थान नव्हते परंतु मला नेहमी वाटायचे आपण काहीतरी करायचे म्हणून मी समाजसेवी इच्छा असल्यामुळे सामाजिक कार्य करण्याचे ठरवले सुरुवातीला घरातून सामाजिक कार्य करण्यासाठी पुरेसा प्रतिसाद नव्हता परंतु मी वाशी येथील टी एच ओ साहेबांकडे पाठपुरावा करत राहिले मला सामाजिक कार्य करायचे आहे त्यासाठी पैसे कमी असले तरी चालतील असे म्हणत त्यांनी माझे शिक्षण माझी आवड आणि माझे कार्य पाहून त्यांनी माझी आशा कार्यकर्ती म्हणून निवड केली 1 ऑगस्ट 2009 माझी आशा कार्यकर्ती म्हणून निवड झाली तो माझा आयुष्यातील आनंदाचा क्षण आहे तेव्हापासून समाजामध्ये माझे एक वेगळेच स्थान निर्माण झाले त्यानंतर काम करत असताना एस एस पी मधून गोदावरी बोंदर व धरती ताई या गरोदर मातांना ट्रेनिंग देण्यासाठी बावी मध्ये आल्या होत्या त्यांनी मला विचारले तुमचे काम छान आहे तुम्ही एस एस पी मध्ये जॉईन होतात का मला पण कामाची आवड असल्यामुळे मी त्यांना म्हणले यशस्वी म्हणजे काय त्यांनी मला यशस्वी बद्दल सर्व माहिती सांगितली व त्या माहिती नंतर मला त्या एस एस पी काम करावे वाटू लागले आरोग्य सखीचे काम पण करू लागले वेळी तेथे पण ट्रेनिंग मिळाली त्यामुळे माझ्या नॉलेज मध्ये खूप बदल झाला कमी दरामध्ये गंभीर आजार टाळण्यासाठी खूप अल्प दरात एच बी शुगर फ्लो मीटर या सर्व तपासण्या कमी दरात केल्या समाजामध्ये स्थान निर्माण झाल्यामुळे स्वच्छता व पाणीपुरवठा समिती सचिव पदी माझी निवड करण्यात आली ग्रामपंचायत मध्ये पण सहभाग असल्यामुळे स्वच्छता गृहिणी म्हणून निवड करण्यात आली आणि शालेय व्यवस्थापन समिती मध्ये अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली व काही दिवस माता बैठक समितीमध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

माझे स्वतः मध्ये खूप परिवर्तन झाले व समाजामध्ये मला चांगले स्थान मिळाले नंतर मी महिलांसोबत बचत गट तयार करण्याचे ठरवले त्यातून सुरुवातीला दोन बचत गट सुरू केले त्यांना आर्थिक मदत सुरू झाली चार महिलांनी व्यवसाय सुरू केला त्यामुळे मला खूप आनंद झाला नंतर मी हळूहळू 11 बचत गट सुरू केले आणि 120 महिला बचत गटांमध्ये आहेत त्यामुळे माझा टेलरिंगचा व्यवसाय उत्कृष्टपणे चालू लागला आणि त्या बचत गटामार्फत महिलांना व्यवसायासाठी शिक्षणासाठी आरोग्यासाठी आर्थिक मदत सुरू झाली आणि बँक ऑफ महाराष्ट्र शासकीय योजना यामधून  महिलांना व्यवसायासाठी कर्ज मिळू लागले त्यामुळे माझ्या स्वतःमध्ये माझ्या घरच्या परिस्थितीमध्ये माझ्या कुटुंबामध्ये मला खूप सन्मान मिळवला आणि समाजामध्ये पण गाव स्तरावर एक नवीन ओळख निर्माण झाली.

मी स्वयं शिक्षण प्रयोग या संस्थेमध्ये आरोग्य सखी ऊर्जा सखी संवाद साहाय्यक म्हणून काम  करत आहे मी आता सेंद्रिय शेती यावर काम करत आहे महिलांना जे रासायनिक खतामुळे होणारे दुष्परिणाम व शेतीवर होणारे दुष्परिणाम नवनवीन आजार होऊ नयेहोऊ नयेत म्हणून दशपर्णी अर्क निंबोळी अर्क गांडूळ खत याचा वापर करून अन्न सुरक्षा शेती यासाठी काम करत आहे माझा उद्देश असा आहे की पुढील काळामध्ये व्यवसायिक महिला बनवणे असा आहे  समाजकार्याची आवड असल्यामुळे एएनएम करण्यासाठी फॉर्म भरला होता तेथील सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे माझे सिलेक्शन झाले परंतु घरच्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे मी जाऊ शकले नाही हा माझा आयुष्यातील खूप मोठा दुःखाचा क्षण आहे

One thought on “शुभांगीचा थक्क करणारा सामाजिक प्रवास”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *