काैशल्याचा व्यवसायीक उपयाेग

पूर्वी भारत हा देश पुरुषप्रधान मानला जायचा त्यामुळे पुरुषा एवढा महिलांचा सहभाग कशामध्ये राहत नव्हता त्यातल्या त्यात एखादी महिला पुढे येऊन एखादे कार्य करायला लागली तर तिला घरातून व समाजातुन कोणाची साथ मिळत नव्हती या कारणाने महिला पूर्वी चूल आणि मूल यामध्ये समाधान मानत असत.          

 पण या सर्व अडचणींवर मात करून पुढे आली एक महिला ती म्हणजे लातूर शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या रेणापूर तालुक्यातील पानगाव या गावाची रहिवाशी. पानगाव हे एक खूप मोठे गाव आहे. या गावात दर शनिवारी फार मोठा बाजार भरतो. या गावातील रहिवासी सौ चंद्रकलाबाई पंडित आप्पा हलकुडे या एक यशस्वी व्यावसायिक महिला म्हणून पुढे आल्या. वयाच्या *65* व्या वर्षी ही त्या जोमाने गेल्या तीन वर्षापासून *तांदळाचे पापड कुरड्या लग्नाचे रुकवत* यासारखे उद्योग फार आवडीने करतात. कष्ट करण्याची प्रवृत्ती ही प्रत्येक माणसामध्ये असते पण काहीतरी वेगळे करून दाखविण्याची जिद्द असते अशाच महिला या जीवनामध्ये यशस्वीरित्या पुढे जाऊन दुसऱ्यासाठी प्रेरणादायी ठरतात.


चंद्रकलाबाई चा प्रवास फार खडतर स्वरूपाचा होता त्यांना तीन अपत्य आहेत दोन मुले आणि एक मुलगी. त्यांचे शिक्षण, लग्न या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी चांगल्या प्रकारे पूर्ण केल्या. सगळं काही ठीक चालू असतानाच चंद्रकलाबाई यांच्या पतींना डोळ्यांचा त्रास होऊ लागला आणि त्यामुळे त्यांना त्यांची नोकरी सोडावी लागली व यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांनी घराची जबाबदारी सांभाळली. दोन्ही मुलं पॅसेंजर ऑटो चालवतात सर्व काही सुरळीत चालु होते पण नियतीला काहीतरी दुसरेच मान्य होते.

चंद्रकलाबाई यांच्या लहान मुलाचा खूप मोठा अपघात झाला व त्यात त्याच्या किडनीला आतून खूप गंभीर मार लागला. जवळ असलेले सर्व पैसे त्यांनी जमा करून मुलाला मुंबईला दवाखान्यात ठेवून त्यावर उपचार सुरू केले पण तिथे मुलाच्या प्रकृतीत काहीही फरक जाणवत नव्हता. शेवटी डॉक्टरने सांगितले की यांना तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता बाकी सर्व देवाच्या हातात आहे. यावर काही इलाज होणार नाही असे त्यांनी सांगितले. या वयात आई-वडिलांना हे दुःख पेलवणारे नव्हते पण मोठ्या मुलाने अतिशय मोठे धाडस करत त्याला लातूरच्या मेडिकल कॉलेजला भरती केले. जवळचे सगळे पैसे संपले होते. पुढील खर्च कसा करायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. मग त्यांनी गावातील काही प्रतिष्ठित लोकांकडून कर्ज घेतले, बचत गटातून पैसे काढले आणि पुढे उपचार चालू ठेवला. असे करीत असतानाच त्यांना औरंगाबादच्या एका आयुर्वेदिक दवाखान्याचा पत्ता मिळाला आणि एक आशेचा किरण सगळ्यांना दिसू लागला. मुलाला त्यांनी लातूरच्या दवाखान्यातून औरंगाबादला घेऊन गेले आणि तेथे डॉक्टरांनी त्यांना खूप मोठा दिलासा दिला. सर्वजण खूप आनंदी झाले अशा रीतीने त्यांचा मुलगा या आजारातून वाचला.

पण लोकांचे पैसे कसे फेडायचे हा प्रश्न आता डोळ्यासमोर उभा होता. एकट्या मोठ्या मुलाच्या कष्टावर हे पैसे फेडणे अशक्य होते. म्हणून आईने (चंद्रकलाबाई) पुढाकार घेतला. त्यांची व्यवसाय करण्याची इच्छा त्यांनी मुलीला बोलून दाखवली आणि मुलीने पापड व्यवसायाची कल्पना चंद्रकला बाईंना सांगितली. चंद्रकला बाईंच्या मुलींनी त्यांना तिच्या सासरी बोलावून घेतले व तिची मैत्रीण पापडाचा व्यवसाय कशी करते किंवा पापडे करायची पद्धत काय आहे हे दाखवले. चंद्रकला बाईंनी जातेवेळेस हात मशीन खरेदी केली आणि लागलीच गावात व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला कोणी एवढे लक्ष देत नव्हते मग त्यांनी जवळच्या लोकांना स्वतः पापड तयार करून नमुना च्या रूपात चवीसाठी खायला देऊ केले. गाव खूप मोठे असल्याने पापड व्यवसाय पण भरपूर होते पण चंद्रकला बाईंच्या पापडाची सर्वांपेक्षा खूप उत्तम चव होती हे लोकांना माहिती झाले. अशा पद्धतीने पूर्ण गावात याची प्रचिती झाली व आसपासच्या खेडेगावात पण याची चर्चा व्हायला लागली. आठवडी बाजाराला येणाऱ्या महिला पापड खरेदीला येऊ लागल्या. शहरात म्हणजे पुणे-मुंबईला राहणाऱ्या आपल्या नातेवाईकाला हे लोक पापड पाठवू लागले.

आज त्यांचे कर्ज पूर्ण फिटले आहे. हे सर्व कुटुंब खूप आनंदात नांदत आहेत. घरातील सर्वच लोक या व्यवसायात काम करतात. चंद्रकलाबाई त्यांचे पती आणि सून हे तिघे पापड बनवतात व मुलगा पॅसेंजर ऑटो चालून आपला उदरनिर्वाह करतात. चंद्रकला बाईंच्या पतींना दोन्ही डोळ्यांना आता बिलकुल दिसत नाही पण ते एकमेकांना या वयात देखील साथ देऊन दुसऱ्यांसाठी एक चांगले जीवन जगण्याचे उदाहरण देतात. त्यांना जेवायला वेळ मिळत नाही. ग्राहकांची एवढी गर्दी त्यांच्याकडे असते.

वयाच्या 65व्या वर्षी जे लोक स्वतःला सांभाळू शकत नाहीत अशा ठिकाणी चंद्रकलाबाई स्वतःला सांभाळून कुटुंबालाही सांभाळून घेतात. त्यांची पैशाची बचत ही खूप चांगली आहे. त्या एक सक्षम महिला च्या रूपात आम्हाला दिसतात. तरुणाला लाजवेल अशी त्यांची जिद्द व मेहनत आहे.अशा या हिमतीने संकटांना तोंड देणाऱ्या *चंद्रकला बाईंना आमचा मानाचा मुजरा*.

आणखी एक विशेष म्हणजे पूर्वी कधीही शाळेत न गेलेल्या चंद्रकला बाईंनी मुलगी सातवीत असताना *साक्षरता अभियान* मध्ये भाग घेतला व रात्रीचे वर्ग घेऊन थोडं फार का होईना शिक्षण पूर्ण केले यातूनच त्यांना शिक्षणाची आवड निर्माण झाली आणि आज त्या या शिक्षणाचा उपयोग करून या व्‍यवसायात उत्तम रीतीने पुढे जात आहेत.याबरोबरच त्यांच्या अजून एका कलेचे उदाहरण म्हणजे त्या स्वतः हातावर ब्लाउज कट करून शिवणकाम सुद्धा करतात. 
तुमच्या पुढील प्रवासाला आमच्या शुभेच्छा.


 *”ये नारी तू ना डर, ठाण ले कोई भी बात* *तू हे दुर्गा का अवतार, ये मानले मेरी बात**हर एक मुष्कील पर, तू करती हे मात तू करती हे मात”*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *