संयुक्त राष्ट्रसंघाचा इक्वेटर पुरस्कार

१७ सप्टेबर 2017 संयुक्त राष्ट्राच्या महासभेत उस्मानाबादच्या कमलाल कुंभार व गोदावरी डांगे यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचा इक्वेटर पुरस्कार स्विकारला. जगातील १५ विजेत्यात स्वयम्‌  शिक्षण प्रयोग ही भारतातील एकमेव संस्था.

स्वयम्‌  शिक्षण प्रयोग या संस्थेने 20 हजार महिलांच्या नेतृत्वाला घडवत, महिलांना सोबतीला घेत हवामानातील बदलावर मात करण्यासाठी पर्यावरणपुरक शेती सोबत अन्न सुरक्षा, उत्पन्न सुरक्षा, निसर्गाच्या लहरीपणातसुध्दा तगणारी शेती आणि महिला सशक्तीकरण या विषयांवर केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल संयुक्त राष्ट्राने घेतली.

हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी मराठवाड्यातील उस्मानाबादच्या गोदावरी डांगे व कमल कुंभार महिला यांनी ग्रामसभा ते थेट संयुक्त राष्ट्राची महासभा असा थक्क करणारा प्रवास महासभेत मांडला.

डांगे गोदावरी – आता एका महिला फेडरेशनची 5000 पेक्षा जास्त महिलांची संस्था चालवत आहेत आणि जैव-शेती आणि जलसंवर्धन यामध्ये स्त्रियांच्या नेतृत्वाखालील नवोपक्रमांना आधार देण्यासाठी 1 कोटीहून अधिक निधी उभारला आहे.

कमल कुंभार – एक महिला कुक्कुटपालन व्यवसाय ते ५ हजार महिलांचा कुक्कुटपालन उद्योग.

शाश्वत शेतीचा हा उपक्रम अर्ध्या ते एक एकरापासुन सुरु होतो. शेतकरी कुटुंबातील पैसे बाहेर जाण्याचे थांबऊन, कुटुंबात शेती व शेतीबाह्य उपक्रमातून पैसे येऊन शेतकरी कुटुंब शाश्वत शेती करुन स्वावलंबी कसे होतील याची काळजीही घेते.

गतकाळातील अनुभवातुन प्रतीएकर 25 टक्के उत्पादन झाल्याचे सिध्द झाले आहे. यामुळे लहान व अल्प शेतकरी कुटुंबासाठी शेती व्यवहार्य झाली आहे.

 

इक्वेटर पुरस्कार हा युएमडीपीच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील स्थानिक आणि देशी गटांवर लक्ष केंद्रित करते. पर्यावरण रक्षण व नैसर्गिक व्यवस्थापन करण्यासाठी नवनवीन उपाय विकसित करणा-या उपक्रमांना पुरस्कृत करते.