महिलांनी नेतृत् स्वीकारुन इतरांनाही मार्गदर्शक व्हावे – जिल्हाधिकारी गमे, उस्मानाबाद

शासनामार्फत देण्यात येण्या-या प्रशिक्षणआचा महिलांनी उपयाेग करुन घ्यावा. विविध उद्याेग . व्यवसाय सुरु करण्यासाठी सकारात्मक भावनेतून एकत्र येऊन स्वतःचा कुटुंबाचा, गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास घडवावा. महिलांनी नेतृत्व स्विकारून इतरांनाही मार्गदर्शक व्हावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्ण  गमे यांनी केले.


स्वयम् शिक्षण प्रयाेगच्या वतीने लेडीज क्लब येथे राष्ट्रीय व्यवसायिकता दिवसानिमित्त आयाेजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी गमे बाेलत हाेते. यावेळी स्वयम् शिक्षण प्रयाेगच्या संचालिका प्रेमा गाेपालन, उपमन्यु पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मनाेज सानप, अन्न व आैषध विभागाचे सहाय्यक आयुक्त बाेराळकर, दे आसरा फाऊंडेशन पुणेचे अनिल पाठक, उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे संजय मंत्री, लक्ष्मीकान्त जाधव यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

गमे म्हणाले की, महिलांनी विविध प्रशिक्षणआचा उपयाेग करुन व्यवसायात उतरावे. यामुळे एक महिला पूर्ण कुटुंबाची प्रगती करु शकते येथील महिला बचत गटांनी जिल्हयातील उत्तम वस्तूंचा पुरवठा इतरांना देण्याइतके सक्षम व्हावे.

त्याचबराेबर पर्यावरणाचा विचार ही करायला हवा असे सांगितले. या कार्यक्रमामध्ये यशस्वी महिला उद्याेजकांचे अनुभव कथन व मार्गदर्शन झाले. यामध्ये यशस्वी ३० महिला उद्याेजकांना स्वयम् शिक्षण प्रयाेगच्या वतीने दरवर्शी यशस्वी पुरस्कार याेजना देण्याचे जाहीर केले. आम्ही सखी यशकथा बुलेटीनचे विमाेचन जिल्हाधिकारींच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काकासाहेब अडसुळे, सुत्रसंचालन आणि आभार किरण माने यांनी केले.

या कार्यक्रमामध्ये ५ जिल्हयातील २०० गावच्या ४५० महिला व्यवसायिक आपल्या उत्पादनासह सहभागी झाले हाेते.