रंजना यांनी दिली शेतीला शेतीपुरक व्यवसायाची जोड

शेती आणि शेतकरी याबाबत अनेक साहित्यकांनी कथा, कादंब­र्‍या यामध्ये शेतक­र्‍याच्या कष्टदायी प्रवासाच्या व्यथा मांडल्या आहेत. परंतु काही शेतक­र्‍यांनी परिस्थितीशी दोन हात करत शेतीली शेतीपुरक व्यवसायाची जोड दिली आहे. शेतीपुरक व्यवसाय करुन नगदी पैसे घरात आल्यांने त्यांचे एकंदरीत जीवनमान उंचावले आहे. अशा यशवंत शेतक­यांच्या कथा ह्या यश कथा झाल्या आहेत. अशी यश कथा लातूर तालुक्यातील बोरवटी या गावातील रंजना दशरथ लकडे यांची आहे.
> रंजना दशरथ लकडे ह्या लातूर तालुक्यातील बोरवटी गावच्या महिला शेतकरी आहेत. त्यांचे शिक्षण 10 वी पर्यंत झाले आहे. पती दशरथ लकडे हे शेती करतात. दशरथ लकडे हे सुध्दा पदवीधर आहेत. अर्थात हे पती-पत्नी सुशिक्षित शेतकरी आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगा एम.एस.सी. करतो आहेत तर मुलगी बी.एस.सी करते आहे. त्यांना बोरवटी गावामध्ये फक्त साडे तीन एकर जमीन आहे.

गावा-गावामध्ये मागील पाच-सहा वर्षापासुन बचत गटाची चळवळ उभी राहिली आहे. रंजनाताई ह्या धनलक्ष्मी महिला बचत गटाच्या सदस्या झाल्या. महिला सक्षमीकरणासाठी व सेंद्रीय शेती महिलांनी करावी यासाठी प्रयत्न करत असलेली स्वंयशिक्षण प्रयोग संस्थेचे काही महिला प्रतिनिधी गावात आले. त्यांनी बचत गटातील महिलांना सेंद्रीय शेती व व्यवसायाचे प्रशिक्षण द्यावयाचे आहे असे सांगितले. संस्थेच्या संवाद सहाय्यक पलम भोसले यांनी आपल्या गावातील महिलांना याबाबत माहिती दिली. व गावातील महिलांनी लातूर येथे येवुन सेंद्रीय शेती व व्यवसाय कसा करावा यांचे  प्रशिक्षण घेतले. रंजना यांनी प्रशिक्षणातुन अनेक गोष्टी शिकल्या व आपण शेतीला जोड व्यवसाय करावयाचा असे त्यांनी ठरविले.

स्वंयशिक्षण प्रयोग संस्थेने त्यांची धडपड लक्षात घेवुन व्यवसाय करण्यांसाठी 10 हजार रुपये कर्ज त्यांना दिले. यातुन रंजना यांनी एक शेळी विकत घेतली.  संस्थेने दिलेल्या कर्जाची परतफेड त्यांनी दहा महिन्यांत केली. आज रोजी त्यांच्याकडे दहा शेळ्या आहेत. वर्षातुन दोन वेळेस शेळी पिल्ले देते. विकलेल्या बोकडापासुन त्यांना वार्षिक 50 हजार रुपये नफा होतो. शेळी पालनांतुन मिळत असलेल्या उत्पन्नामुळे त्यांच्यात उत्साह निर्माण झाला. व त्यांनी दुग्ध व्यवसाय करण्यांचे ठरविले.
> दुग्ध व्यवसायासाठी त्यांनी सुरूवातीला एक म्हैस खरेदी केली. असेच एक-एक करत आज त्यांच्याकडे चार म्हशी व तीन गावरान गाई आहेत. प्रतिदिन साधारणपणे 30 लिटर दुध त्या 40 ते 50 रुपये दरांनी गावात व लातूर शहरात विकतात. खर्च वजा जाता प्रतिदिन 1 हजार रुपये त्या कमवतात. हे सगळे स्वंय शिक्षण प्रयोग संस्थेमुळे शक्य झाले असल्याचे त्या सांगतात.

सेंद्रीय शेतीचा पुरस्कार
> संस्थेने दिलेल्या प्रशिक्षणातुन त्यांनी विषमुक्त अशी झिरो बजट शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षापासुन त्या सेंद्रीय शेती करत आहेत. यासाठी त्यांनी गांडुळ खताचे बेड उभे केले आहे. जनावरांसाठी अझोला ही निर्माण केला आहे. संस्थेच्या सखी अन्न सुरक्षा कार्यक्रमाप्रमाणे त्यांनी 1 एकर सेंद्रीय शेती करुन मिश्र पिक पध्दतीचा अवलंब केला आहे. खरीप हंगामात त्यांनी मुग, उडीद, तीळ, साळ, राळे, भगर आदी पिके मिश्र पिक पध्दतीने घेतली आहेत.
> रब्बी हंगामात बडी ज्वारी, बागायती गहु, मोहरी, वटाणा, मसुर इत्यादी पिकासोबत कांदा, लसुन, पालक, टमाटे आदी भाजीपाला पिके ही त्यांनी घेतली आहेत. सिंचनासाठी त्या रेण पाईपचा वापर करतात. पिकावरील किड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्कची फवारणी करतात. दोन बोरच्या पाण्यावर त्यांनी आपली शेती दुष्काळ परिस्थिती असतानाही हिरवीगार केली आहे.

सेंद्रीय शेतीच्या तज्ञ
रंजनाताई ह्या शेतीच्या निष्णात तज्ञ आहेत. पिकांवरील किड व कोणत्या सेंद्रीय औषधांची फवारणी करावयाची याची त्यांना जाण आहे. मागील वर्षी त्यांनी 10 किलो गुळ, 60 किलो. शेण, 15 लिटर गोमुत्र व 4 किलो हरबरा दाळीचे पिठ, दोन टोपले वडाच्या झाडाखालील माती याचे मिश्रण करुन जीवामृत तयार केले होते. याच्या फवारणीमुळे उत्पादनात वाढ झाली असल्याचे त्या सांगतात.
> भविष्यात त्यांना पुर्णपणे सेंद्रीय शेती करावयाची असुन शेळीपालन व दुग्ध व्यवसाय हा आधुनिक पध्दतीने करावयाचा आहे. कष्टाळु, संयमी, प्रेम मनाच्या रंजनाताई यांची वाटचाल निश्चित आशावादी आहे. त्यांच्या भावी आयुष्यास मन:पुर्वक शुभेच्छा..!

शेती आणि शेतकरी याबाबत अनेक साहित्यकांनी कथा, कादंब­र्‍या यामध्ये शेतक­र्‍याच्या कष्टदायी प्रवासाच्या व्यथा मांडल्या आहेत. परंतु काही शेतक­र्‍यांनी परिस्थितीशी दोन हात करत शेतीली शेतीपुरक व्यवसायाची जोड दिली आहे. शेतीपुरक व्यवसाय करुन नगदी पैसे घरात आल्यांने त्यांचे एकंदरीत जीवनमान उंचावले आहे. अशा यशवंत शेतक­यांच्या कथा ह्या यश कथा झाल्या आहेत. अशी यश कथा लातूर तालुक्यातील बोरवटी या गावातील रंजना दशरथ लकडे यांची आहे.

रंजना दशरथ लकडे ह्या लातूर तालुक्यातील बोरवटी गावच्या महिला शेतकरी आहेत. त्यांचे शिक्षण 10 वी पर्यंत झाले आहे. पती दशरथ लकडे हे शेती करतात. दशरथ लकडे हे सुध्दा पदवीधर आहेत. अर्थात हे पती-पत्नी सुशिक्षित शेतकरी आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगा एम.एस.सी. करतो आहेत तर मुलगी बी.एस.सी करते आहे. त्यांना बोरवटी गावामध्ये फक्त साडे तीन एकर जमीन आहे.

गावा-गावामध्ये मागील पाच-सहा वर्षापासुन बचत गटाची चळवळ उभी राहिली आहे. रंजनाताई ह्या धनलक्ष्मी महिला बचत गटाच्या सदस्या झाल्या. महिला सक्षमीकरणासाठी व सेंद्रीय शेती महिलांनी करावी यासाठी प्रयत्न करत असलेली स्वंयशिक्षण प्रयोग संस्थेचे काही महिला प्रतिनिधी गावात आले. त्यांनी बचत गटातील महिलांना सेंद्रीय शेती व व्यवसायाचे प्रशिक्षण द्यावयाचे आहे असे सांगितले. संस्थेच्या संवाद सहाय्यक पलम भोसले यांनी आपल्या गावातील महिलांना याबाबत माहिती दिली. व गावातील महिलांनी लातूर येथे येवुन सेंद्रीय शेती व व्यवसाय कसा करावा यांचे  प्रशिक्षण घेतले. रंजना यांनी प्रशिक्षणातुन अनेक गोष्टी शिकल्या व आपण शेतीला जोड व्यवसाय करावयाचा असे त्यांनी ठरविले.

स्वंयशिक्षण प्रयोग संस्थेने त्यांची धडपड लक्षात घेवुन व्यवसाय करण्यांसाठी 10 हजार रुपये कर्ज त्यांना दिले. यातुन रंजना यांनी एक शेळी विकत घेतली.  संस्थेने दिलेल्या कर्जाची परतफेड त्यांनी दहा महिन्यांत केली. आज रोजी त्यांच्याकडे दहा शेळ्या आहेत. वर्षातुन दोन वेळेस शेळी पिल्ले देते. विकलेल्या बोकडापासुन त्यांना वार्षिक 50 हजार रुपये नफा होतो. शेळी पालनांतुन मिळत असलेल्या उत्पन्नामुळे त्यांच्यात उत्साह निर्माण झाला. व त्यांनी दुग्ध व्यवसाय करण्यांचे ठरविले.

दुग्ध व्यवसायासाठी त्यांनी सुरूवातीला एक म्हैस खरेदी केली. असेच एक-एक करत आज त्यांच्याकडे चार म्हशी व तीन गावरान गाई आहेत. प्रतिदिन साधारणपणे 30 लिटर दुध त्या 40 ते 50 रुपये दरांनी गावात व लातूर शहरात विकतात. खर्च वजा जाता प्रतिदिन 1 हजार रुपये त्या कमवतात. हे सगळे स्वंय शिक्षण प्रयोग संस्थेमुळे शक्य झाले असल्याचे त्या सांगतात.

सेंद्रीय शेतीचा पुरस्कार

संस्थेने दिलेल्या प्रशिक्षणातुन त्यांनी विषमुक्त अशी झिरो बजट शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षापासुन त्या सेंद्रीय शेती करत आहेत. यासाठी त्यांनी गांडुळ खताचे बेड उभे केले आहे. जनावरांसाठी अझोला ही निर्माण केला आहे. संस्थेच्या सखी अन्न सुरक्षा कार्यक्रमाप्रमाणे त्यांनी 1 एकर सेंद्रीय शेती करुन मिश्र पिक पध्दतीचा अवलंब केला आहे. खरीप हंगामात त्यांनी मुग, उडीद, तीळ, साळ, राळे, भगर आदी पिके मिश्र पिक पध्दतीने घेतली आहेत.

रब्बी हंगामात बडी ज्वारी, बागायती गहु, मोहरी, वटाणा, मसुर इत्यादी पिकासोबत कांदा, लसुन, पालक, टमाटे आदी भाजीपाला पिके ही त्यांनी घेतली आहेत. सिंचनासाठी त्या रेण पाईपचा वापर करतात. पिकावरील किड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्कची फवारणी करतात. दोन बोरच्या पाण्यावर त्यांनी आपली शेती दुष्काळ परिस्थिती असतानाही हिरवीगार केली आहे.

सेंद्रीय शेतीच्या तज्ञ
रंजनाताई ह्या शेतीच्या निष्णात तज्ञ आहेत. पिकांवरील किड व कोणत्या सेंद्रीय औषधांची फवारणी करावयाची याची त्यांना जाण आहे. मागील वर्षी त्यांनी 10 किलो गुळ, 60 किलो. शेण, 15 लिटर गोमुत्र व 4 किलो हरबरा दाळीचे पिठ, दोन टोपले वडाच्या झाडाखालील माती याचे मिश्रण करुन जीवामृत तयार केले होते. याच्या फवारणीमुळे उत्पादनात वाढ झाली असल्याचे त्या सांगतात.

भविष्यात त्यांना पुर्णपणे सेंद्रीय शेती करावयाची असुन शेळीपालन व दुग्ध व्यवसाय हा आधुनिक पध्दतीने करावयाचा आहे. कष्टाळु, संयमी, प्रेम मनाच्या रंजनाताई यांची वाटचाल निश्चित आशावादी आहे. त्यांच्या भावी आयुष्यास मन:पुर्वक शुभेच्छा..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *