सुरेखा कोडे यांनी साधली व्यवसायातुन प्रगती

‘थेंब थेंबे तळे साचे’ या म्हणी प्रमाणे एक-एक रुपयांची केलेली बचत एके दिवशी खुप मोठा संचय निर्माण करते. व आपल्या अवती-भवतीची माणसे सहजपणांनी म्हणतात. काही नव्हते हो यांच्या पाशी हा जो प्रवास आहे. हा यशस्वी प्रवास होण्यासाठी त्या व्यक्तीने घेतलेले कष्ट, कामातील सातत्य, केलेली बचत ,सहजपणांनी साधलेला लोकांशी प्रेमळ संवाद, व पुढे जाण्यांची  प्रबळ इच्छा शक्ती या बाबी महत्वपुर्ण ठरतात. अशाच आपला यशस्वी व्यावसायिक प्रवास केला आहे.  सुरेखा संभाजी कोडे या रेणापुर तालुक्यातील सेलु जवळगा गावातील  35 वर्षीय महिलेने त्यांचा हा प्रवास इतरांसाठी निश्चित प्रेरणादायी आहे.

सुरेखा संभाजी कोडे ह्या रेणापुर पासुन साधारण 15 कि.मी. अंतरावर असलेल्या सेलू जवळगा ह्या गावातील महिला शेतकरी. घरी सासु,पती, दोन मुली असा परिवार आहे. त्यांचे पती संभाजी कोडे हे किरणा दुकान चालवतात. पती संभाजीराव ही निव्र्यसणी, कष्टाळु व प्रामाणिक आहेत. त्यांनी ही आपला व्यवसाय वाढविला आहे. आज रोजी त्यांची गावात तीन किरणा दुकाने आहेत. एका दुकानाची जबाबदारी पती स्वत: सांभाळतात. दुसर्‍या दुकानाची जबाबदारी सासुबाई कमलबाई सांभाळतात. तर तिस­र्‍या दुकानाची जबाबदारी अकरावीत शिकत असलेली मुलगी संभाळते .घरातील पती, सासु, मुलगी काम करत असताना आपण ही काही तरी केले पाहीजे असे त्यांना वाटू लागले .

दरम्यानच्या काळात त्यांच्या गावात सेंद्रीय शेती व महिलांना
व्यवसायिक प्रशिक्षण देण्यासाठी जागतीक दर्जाची स्वयंशिक्षण प्रयोग
संस्था आली. त्या संस्थेच्या संवाद सहाययक ज्योती पंडीत लांबोटे यांनी
त्यांना या संस्थेचे सेंद्रीय शेती व व्यावसायिक प्रशिक्षण आपण घेवू असे
सांगीतले. व त्यांनी रेणापूर येथे दहा दिवसांचे व्यवसायिक व सेंद्रिय
शेतीचे प्रशिक्षण घेतले व त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेने त्यांची धडपड पाहून 10 हजार रुपये कर्ज दिले. व त्यांनी 2016 मध्ये एक पिठाची चक्की खरेदी केली. त्यानंतर त्यांनी ज्वारी साठी एक गहु  दळण्यासाठी एक पिठाची चक्की खरेदी केली. त्यांनंतर त्यांनी दाळी करण्यासाठी मिनी दाळ यंत्र खरेदी केले. एवढयावरच त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी शेवाया व पापड करण्यासाठी आणखी एक मशिन खरेदी केली आहे. आज रोजी त्यांच्याकडे चार चक्क्या आहेत.

पति-पत्नी व सासुबाई यांच्या एकत्रित प्रयत्नांतून त्यांनी दोन वर्षाखाली रेणापूर जवळगा रोडवर साडे बारा लाख रुपये प्रति एकर एवढी रक्कम देऊन दोन एकर जमीन खरेदी केली आहे. प्रति दिन पिठाच्या चक्कीच्या व्यवसायातून त्या चारशे रुपये कमावतात एवढे नव्हे तर त्यांनी सेंद्रीय शेती करण्यांसाठी दोन देवणी जातीच्या जातिवंत गाई खरेदी केल्या आहेत. तसेच त्यांच्याकडे सात शेळया ही आहेत गावातील एका शेतक-याची दोन एक्कर जमीन प्रति एक्कर 14 हजार रुपये मुनाफा देऊन त्या करतात आज त्यांच्या शेतामध्ये दुष्काळ परीस्थिती असताना दोन एक्कर हरभरा व दोन एक्कर बागायती ज्चारी आहे.

सासुबाई कडुन मिळाला व्यवसायाचा वारसा
सुरेखा यांच्या सासुबाईंचे वय 70 वर्षांचे आहे. त्यांच्या सासु कमलबाई हया आजही एक किराणा दुकान चालवतात. बांगडया भरतात व काही काळी त्यांनी माळवे विक्रीचा ही व्यवसाही केला आहे.सासु कमलबाई यांच्या कडूनच व्यवसायाचा समृध्द वारसा त्यांना मिळाला आहे.

सेंद्रीय शेतीचा पुरस्कार
स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या प्रशिक्षणांतुन त्यानी विषमुक्त अन्न तयार करण्यासाठी  सेंद्रीय शेतीचा स्विकार केला आहे. मागील दोन वर्षांपासुन त्या पुर्णपणे सेंद्रीय शेती करत आहेत. मिश्रपिक पध्दतीचा अवलंब करुन घरी लागणारे अन्न त्यांनी सेंद्रीय पध्दतीने पिकविले आहे.

शेती ,गाई, शेळ्या, किराणा व्यवसाय पिठाची चक्कीचा व्यवसाय करत त्यांचा परिवार आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला आहे. शेतीला शेतीपुरक व्यवसायाची जोड दिल्यांने हे शक्य झाले अाहे .
त्यांची आतापर्यंतची यशस्वी वाटचाल गावातील प्रत्येकास मदत करत झाली आहे.
लग्न समारंभासाठी किंवा अन्य कार्यासाठी कुणी आर्थिक दृष्ट्या नडला असेल
तर त्यास त्या मदत करतात. त्यांची ही वाटचाल सर्वांना सोबत घेवुन आहे. मी
व्यवसायात हा केवळ स्वंय शिक्षण प्रयोग संस्थेमुळे करत असल्याचे त्या
सांगतात. त्यांच्या पुढील वाटचालीस मन:पुर्वक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *