दुग्ध व्यवसायातुन साधली समीना यांनी प्रगती – समीना फिरोज पठाण

“केल्याने होत आहे रे आधी केलचि पाहिजे” या संत वचनाप्रमाणे समीना पठाण यांनी  आपल्या पतींना साथ देत शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देवुन आपली प्रगती साधली आहे. पती-पत्नीच्या समविचारांने आर्थिक प्रगती साधत आपले गावातील व नातेवाईकांतील आपले स्थान त्यांनी प्रतिष्ठीत केले आहे. त्यांचा हा प्रयत्नवादी प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी असा आहे.

समीना फिरोज पठाण यांचे गाव लातूर शहरानजीक कासारखेडा हे आहे. 9 वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या समीना यांचे माहेर लातूर आहे. त्यांचे वडील लातूर आडत बाजारामध्ये हमाली व्यवसाय करत होते. आई-वडील, दोन भाऊ असा पाच माणसांचा प्रपंच चालविण्यास त्यांच्या आई-वडीलांना खुप कष्ट करावे लागत होते. समीना यांनी लहानपणापासुनच गरीबींची जाणीव होती. 2006 मध्ये अल्पवयीन असतानाच समीना यांचा विवाह दुग्ध व्यवसाय करणार्‍या  कासारखेडा येथील फिरोज पठाण यांच्या सोबत झाला.

सासरी सासु-सासरे, दोन दिर असा आठ-दहा माणसांचा परिवार अाहे. घरी फक्त दिड एक्कर जमीन पती गावातील दुध जमा करुन लातूर शहरात रबीत घालत. यांतुन 200-300 रुपये मिळत होते. त्यातुन प्रपंच भागवणे कठीण होते. सासु-सासरे, दिर-जावा इतर शेतकर्‍या­कडे शेतमजुरी करत. समीन यांचे बालपण लातूर शहरात गेल्याने शेतीतील काम ही जमत नव्हते .व त्यांना मजुरी करणे ही शक्य नव्हते. दरम्यानच्या काळात त्या आपल्या कुटूंबापासुन विभक्त झाल्या. पती गावातील इतर शेतक­र्‍यांचे दुध जमा करुन लातूर शहरात विकत होते. समीना यांना वाटु लागले आपणच दुभती जनावरे खरेदी केली तर आपणांस अधिक नफा मिळेल. दरम्यानच्या काळात त्या स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या संवाद सहाय्यक शारदा स्वामी यांच्या संपर्कात आल्या. शारदाताईंनी समीना यांना स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेविषयी माहिती सांगितली व त्यांना संस्थेच्यावतीने व्यवसाय व सेद्रींय शेती विषय प्रशिक्षणास घेण्यांचा सल्ला दिला. लातूर शहरात येवुन त्यांनी संस्थेचे दहा दिवसाचे प्रशिक्षण घेतले.  व त्यांची मनोजागृती झाली. व्यवसाय व सेंद्रीय शेती बाबत योग्य व नेमकी तांत्रीक माहिती मिळाली व त्यानी दुग्ध व्यवसाय करण्यांचे ठरविले.

समीना यांची तीव्र इच्छा लक्षात घेवुन स्वंयशिक्षण प्रयोग संस्थेने त्यांना 20 हजार रुपये कर्ज दिले. त्या कर्जातुन त्यांनी एक गावरान गाय खरेदी केली गाय खरेदी करण्यां अगोदर त्यांनी चारा साठवुन ठेवला होता असे करत करत त्यांच्याकडे आज रोजी तीन गाई व चार जातिवंत अश्या गवळाव म्हैशी अाहेत. जनांवरापासुन त्यांना प्रतिदिन 40 लिटर दुध मिळते .गावातील 20 लिटर दुध त्यांचे पती 50 ते 60 रुपये या भावाने लातूर शहरात विकतात. त्यातुन खर्च वजा जाता प्रतिदिन 2 हजार रुपये त्या कमावतात.

कुटूंबापासुन विभक्त राहुन त्यांनी तीन गुंठे जागा गावात खरेदी केली आहे. आज त्यांच्याकडे एक गुंठ्यात राहते घर, एक गुंठ्यात जनावरांसाठीचे अत्याधुनिक शेड व एक गुंठ्यात शेणखत व जनावरांच्या चा­र्‍याची साठवण त्यांनी केली आहे. जनावरांच्या पिण्याचा पाण्यांसाठी हौद आहे. पती दुध लातूरला पोहचते करतात. तर समीना या जनावरांची देखभाल करतात. शेण काढण्या पासुन दुध काढण्या पर्यंतची सगळी कामे त्या सहगत्या पार पाडतात. हे सगळे काम मी अतिशय आनंदाने करते अशा  त्या सांगतात.

सेंद्रीय शेतीचा पुरस्कार
समीना यांना दिड एक्कर शेती आहे. घरी शेणखत असल्यांमुळे त्यांची शेत जमीन पुर्णपणे शेणखतांने खतावली आहे. मांजरा नदी काठी काळीभोर जमीन सोन उगावणारी आहे. मागील दोन वर्षापासुन त्या सेंद्रीय शेती करतात. संस्थेच्या सखी अन्न सुरक्षा कार्यक्रमाप्रमाणे घरी लागणारे अन्न सेंद्रीय पध्दतीने पिकविण्यांचे त्यांनी ठरविले आहे. मागील हंगामात त्यांनी सोयाबीन, तीळ, मुग, उडीद, तुर आदी पिके  मिश्र पिक पध्दतीचा अवलंब करुन घेतली आहेत. किड नियंत्रणासाठी दशपर्शी अर्क त्या वापरतात. जमीनीमध्ये भरपुर शेणखत असल्यामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होत नसल्यांचे त्या अनुभवा वरुन सांगतात.

शेणखताच्या विक्रीतुन चारा खरेदी
कोणताही व्यवसाय हा बारकाईने केल्यास यश नक्की मिळते व प्रगती ही होते. समीना या  शेणखताच्या विक्रीतुन अालेल्या पैशातुन चारा खरेदी करतात. तसेच त्या इतर शेतक­र्‍याचे दुध खरेदी करुन विकतात. त्या दुध विक्रीच्या नफ्यावरुन त्यांच्या जनावरांच्या चारा व खुराचा खर्च निघतो. हे व्यवसायातील गुपीत असल्याचे त्या सांगतात.

तसेच त्यानी मागील हंगामात दिड एक्कर मका पेरली होती. त्याची विक्री त्यांनी नांदेड येथील बाजारात केली. त्यातुन त्यांना 50 हजार रुपयांचा नफा झाला अाहेा.मका काढुन त्यांनी कोथींबीर पेरली होती. त्यांतुन त्यांना 30 हजार रुपयाचा नफा मिळाला आहे.

भविष्यात त्यांना दुधाचे पॉकेट तयार करुन विक्री करावयाची आहे. या दुधाला नाव देवुन एक बँड स्वत:च्या नावे बाजारात आणावयाचा आहे. त्या दृष्टिने त्यांची वाटचाल सुरू आहे. हे सगळे मी स्वंयशिक्षण प्रयोग संस्थेमुळे करु शकले असे त्या सांगतात.

स्वत:चा विकास साधत असताना त्यांनी इतर महिलांना ही रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. त्यामध्ये सविता अच्युत शिंदे, ललीता सुधाकर शिंदे, नसरिण पठाण, दिलशाद पठाण या महिलांना जातीवंत अशा गवळाव म्हैशी खरेदीसाठी प्रवृत्त केले आहे. त्यांचे ही दुध त्या योग्य भाव देवुन त्या खरेदी करतात. त्यांचा हा वेगळा प्रवास प्रेरणादायी असाच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *