अनुभवाचे बोल

सेंद्रीय शेती केल्यामुळे आपण विषमुक्त अन्न खावू शकतो. शेतीची सुधारणा होते आणि आपण कुठल्याच रोगाला बळी पडत नाही, किमान एक एकर तरी सेंद्रीय शेती ही शेतकर्‍यांनी स्वत:च्या कुटुंबाला लागणारे अन्नधान्य व भाजीपाला तरी विषमुक्त असावे.

दिपमाला स्वामी, महापूर जि.लातूर

 

मी प्रथम एक गृहीणी होते. तेव्हा गावपातळीवर युनिसेफ अंतर्गत दिपशिखा प्रकल्प सुरु झाला. 2008 मध्ये तेव्हा दिपशिखा प्रकल्पामध्ये प्रेरिका म्हणून काम केले. दिपशिखा म्हणून काम करत असताना माझा गावच्या सर्व नागरीकासी संपर्क आला हे करत असताना मी मुलींना व महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम केले हे करत असतानाच माझे काम  बघुन मला तसेच माझ्या गावासारखेच मला दहा गावाचे काम देण्यात आले.

जुन 2016 पासून स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेमध्ये रुजु झाले. त्या संस्थेने माझ्यावर संवाद सहाय्यकाची जिम्मेदारी टाकली. त्यात स्वयं शिक्षण प्रयोग या संस्थेकडून मी संवाद सहाय्यकाची कार्य प्रणाली समजावून घेतली व कामाला सुरुवात केली. त्या कामाचे स्वरुप होते 100 शेतकरी आणि 5 व्यवसायिक महिलांना जोडून आपल्याला काम करावयाचे आहे हे समजावण्यात आले. गावामध्ये कामाला सुरुवात केली व 100 शेतकर्‍यांची बैठका घेतल्या. 5 व्यवसायिक महिलांना जोडले व जे संस्थेकडून शेतकर्‍यांसाठी माहिती पुरवली. पेरणीपूर्व मशागत यापासून सुरुवात केली उगवणक्षमता तपासणी करुन दाखवण्यात आले. जी काही संस्थेकडून माहिती माझ्यापर्यंत आली ती मी शेतकर्‍यांपर्यंत पोहचवली. सर्व शेतकर्‍यांच्या गृहभेटी द्वारे माहिती पुरवत गेले. सर्व शेतकर्‍यांची शौचालय बांंधकाम, वृक्षारोपण, गांडुळ खत, कंपोस्ट खत ते बोअरवेल्स पूनर्रभरण, नाला खोलीकरण, किड व्यवस्थापन माहिती ही शेतकर्‍या पर्यंत पोहचवले व शेतकर्‍यांची सर्व प्रकारची माहिती एैकुन त्यांच्यामध्ये होणारे बदल पुढील प्रमाणे आहेत.

शेतकर्‍यांना सेंद्रीय शेतीचे महत्त्व पटवून सांगण्यात आले. सेंद्रीय शेती केल्यामुळे आपण विषमुक्त अन्न खावू शकतो. शेतीची सुधारणा होते आणि आपण कुठल्याच रोगाला बळी पडत नाही हे ही सांगण्यात आले व किमान एक एकर तरी सेंद्रीय शेती ही शेतकर्‍यांनी स्वत:च्या कुटुंबाला लागणारे अन्नधान्य व भाजीपाला तरी विषमुक्त असावा हे ही सांगण्यात आले. कुठल्याही रासायनिक खताचा व फवारणीचा वापर करु नका असे सांगण्यात आले व सर्वाना हे पटले व शेतकरी सेंद्रीय शेती करण्यास तयार आहेत. घरी खाण्यासाठी भाजीपाला तसेच घरगुती लागणारे अन्नधान्य शेतकरी आपल्या शेतात सेंद्रीय पद्धतीने करण्यास सुरुवात केली आहे. असे अनेक कामे संस्थेने आमच्या पर्यंत प्रशिक्षणाद्वारे पुरवले व मी ते शेतकर्‍यापर्यंत पोहचवले. तसेच संस्थेने आमची सहल दाखवण्यास नेली पारगाव येथील वसुधा सरदार यांची सेंद्रीय शेती दाखवण्यात आली. त्या ठिकाणला दाखवण्यासाठी प्रत्येक गावातील शेतकर्‍याची एक जोडी व संवाद सहाय्यक यांचा समावेश होता.

सेंद्रीय शेतीची खुप अशी माहिती मला मिळाली व ती माहिती मी शेतकर्‍यापर्यंत पोहचवली अशा अनेकदा वेगवेगळी माहिती शेतकर्‍यापर्यंत पोहचवली व शेतकर्‍यांना जोडून 5 व्यवसायिक महिला आहेत. त्यांना संस्थेमार्फत प्रत्येक महिन्यात दोन वेळा प्रशिक्षणासाठी संस्थेच्या ऑि’स ’ध्ये घेऊन गेले व त्यांना 8 वेळा प्रशिक्षण देण्यात आले व त्या महिलांना खुप असे ज्ञान या प्रशिक्षणाद्वारे मिळाले व त्या महिलांना अगोदर व्यवसायाबद्दलचे कुठलेच ज्ञान नव्हते. त्यांना ज्ञानात भर पडल्यामुळे त्यांचा व्यवसायात वाढ झाली व व्यवसाय कसा करावा हे समजले व्यवसायात सुधारणा झाली.
त्यानंतर काही शेतकर्‍यांना आर्थिक मदतीचा ही हात संस्थेने दिला. माझ्या गावातील 3 महिलांना आर्थिक मदत मिळाली व आणखी 5 व्यवसायिक महिलांनाही संस्था कर्ज स्वरुपात आर्थिक मदत करत आहेत. आर्थिक मदत मिळाल्यामुळे शेतकर्‍यांचा हातभार मिळाला. त्यांच्या शेतीला लागणारे पाणी हे स्प्रींक्लर द्वारे देत आहेत. संस्थेने स्प्रींक्लर व शेततळे यासाठी कर्ज दिल्यामुळे त्या शेतकर्‍यांची हळूहळू सुधारणा होत आहे. माझ्या गावातील शेतकर्‍यांना खुप ममोठी मदत संस्थेकडून झाली आहे व महिलाही कधी घराबाहेर न पडणार्‍या सुद्धा घराबाहेर पडल्या व त्या आता स्वत: शेती करीत आहेत. संस्थेसाठी कितीही लिहिले तरी माझे शब्द कमी पडतील. अशी मदत संस्थेकडून मिळाली माझे चार शब्द संपवते.